fbpx
images 3 या भागात नळ जोडणीची नोंद करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर भर देणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- ग्रामीण भागात नळ जोडणीची नोंद करताना अनेक अडचणी येत असतात. मात्र या अडचणी सामंजस्याने सोडवून नळ जोडणीच्या नोंदी करण्यात याव्यात, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या जळगाव जिल्ह्यातील कामांचा आढावा पाटील यांनी मंत्रालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

            महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जळगाव जिल्ह्यात  विविध योजनांची कामे सुरु आहेत. ही कामे प्राधान्याने पूर्ण करीत असताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. या बैठकीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत प्रगतीपथावरील योजना, जलस्वराज्य टप्पा-2 कार्यक्रमाअंतर्गत प्रगतीपथावरील योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत नवीन प्रस्तावित योजना, नगरोत्थान अभियान, अमृत योजनांतर्गत सुरु असलेल्या कामांचाही पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM या भागात नळ जोडणीची नोंद करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर भर देणार

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update