corona 8 750x375 1
National

या शहरात मास्क न वापरल्यास होणार एक हजार रुपये दंड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा  अपडेट राहा

पुणे- सध्या मास्क वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड करण्यात येतो. परंतु आता तो आणखी वाढवण्याचा विचार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे अजित पवार यांनी ही घोषणा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या 210 व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची क्षमता असलेल्या हॉस्पिटलचे उद्घाटन झालं आहे.

                     पुण्यात दररोज दोन ते अडीच हजार संख्येमध्ये नवीन कोरुना रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण पडतोय. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर सुविधा असलेली चार हॉस्पिटल उभारण्यात आली आहेत. त्यातील दोन हॉस्पिटलचं उद्घाटन आज करण्यात आलं. या चारही हॉस्पिटल्स मध्ये मिळून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येला ही हॉस्पिटल्स पूर्ण ठरू शकतील का याबद्दल शंका आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याची गरज नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com