governor 750x375 1
Economy National

राज्यपालांच्या हस्ते राजभवनमध्ये मातृशक्तीचा सन्मान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणांचा अमिट ठसा उमटविणाऱ्या महिलांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन येथे ‘प्रेरणादायी नेतृत्व‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

                ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आशा खाडिलकर, न्यायवैद्यक शास्त्रज्ञ डॉ. वसुधा आपटे, विमानचालन क्षेत्रातील उद्योजिका लिना जुवेकर – दत्तगुप्ता, डॉ. उज्वला जाधव व बेलिन्डा परेरा (समाजकार्य) व दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका शिबानी जोशी यांना यावेळी प्रशस्तीपत्र व भगवद्गीतेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. प्रिया सावंत यांच्या लीडिंग लेडी फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

           मातृशक्तीचा सन्मान करणे हे आपले सौभाग्य असल्याचे सांगून महाराष्ट्रात महिला विविध क्षेत्रात नेतृत्व प्रदान करीत आहेत ही अभिमानाची गोष्ट असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. हिन्दी आणि इंग्रजी वृत्तपत्रांपेक्षा मराठी वृत्तपत्रांमध्ये महिला स्तंभलेखिका मोठ्या प्रमाणात लिखाण करीत असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदविले.

खासदारांनी मराठी काव्यपंक्तीसुभाषिते वापरावी

महाराष्ट्रातील खासदार संसदेत आवर्जून हिन्दी भाषेत बोलतात. भाषणात ते उर्दू शेरोशायरी किंवा हिन्दी कवितांचा उल्लेख करतात याबरोबरच त्यांनी मराठी भाषेत विपुल काव्यभांडार, सुंदर काव्यपंक्ती व सुभाषिते यांचाही उल्लेख करावा. मराठी भाषेतील प्रेरणादायी विचार व काव्यपंक्तींचे पुस्तक असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समर्थ रामदासांचा ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा’ हा श्लोक आपणांस आवडल्याने तो पाठ करून ठेवला, तसेच लीला गोळे यांची ‘आनंदवन भुवनी’ ही कादंबरी वाचल्याचेही त्यांनी सांगितले.

गोल्डन सक्सेस स्किल्स‘ पुस्तकाचे प्रकाशन

महिलांना यशाचा कानमंत्र सांगणारे प्रिया सावंत यांनी लिहिलेले ‘गोल्डन सक्सेस स्किल्स’ या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com