Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६२ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३५ हजार ७९५ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २५ कोटी ७९ लाख ०३ हजार ५६४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १९ सप्टेंबर या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३५८ (८९४ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार ११६
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७
जप्त केलेली वाहने – ९६, १७२
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील १९५ पोलीस व २२ अधिकारी अशा एकूण २१७ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.
पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपे/्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143