images 4
Environment Health International Maharashtra Maharashtra Gov National Religious

सांगलीतील लोकवर्गणीव्दारे उभारलेले हकीम लुकमान कोविड सेंटर अत्यंत कौतुकास्पद

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सांगली- कोरोनाबाधित रूग्णांना वेळेत ऑक्सिजन व औषधोपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी बेड्सची संख्या वाढविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सांगली येथील मुस्लिम समाजाच्या वतीने लोकवर्गणी गोळा करून सांगली येथे मोहंमदिया ॲग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले 100 बेड्सचे हकीम लुकमान कोवीड सेंटर ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

          मोहंमदिया ॲग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले हकीम लुकमान कोवीड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, असिफबाई बाबा, नगरसेवक फिरोज पठाण, उमर गवंडी, कय्युम पटवेगार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना रूग्णांवर उपचारासाठी योग्य उपचार पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. रूग्ण रूग्णालयात दाखल होताच तो पूर्णपणे बरा करण्यासाठी पूर्ण ताकद लावून काम केले पाहिजे. वेळेत व योग्य वेळी योग्य उपचार झाले पाहिजेत. यासाठी मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांसमवेत जिल्ह्यातील डॉक्टरांशी झुमव्दारे संवाद साधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

                  प्रास्ताविकात असिफभाई बाबा यांनी  हकीम लुकमान कोवीड सेंटरमध्ये 100 बेड्स असून त्यामध्ये 5 व्हेंटीलेटर बेड, 45 ऑक्सिजन बेड, 50 आयसोलेटेड बेड, 20 तज्ज्ञ डॉक्टर, 40 नर्सिंग स्टाफ, प्रत्येक रूमला सीसीटीव्ही कॅमेरा, नातेवाईकांच्या संपर्कसाठी इंटरकॉम आदि सुविधा असल्याची माहिती दिली. तसेच कोविड सेंटर उभारणीसाठी मदत केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. यावेळी काही दानशूर व्यक्तींनी या कोविड सेंटरसाठी देणगी दिली तसेच काहिंनी देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली

#solapurcitynews

जाहिरात–

Sidd

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com