fbpx
images 2 वाघ व मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करा

वन विभागाचे अधिकारी व गावकऱ्यांसोबत बैठक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा  अपडेट राहा

यवतमाळ- केळापूर तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या गावात वाघाने धुमाकूळ घातला आहे. या वाघाच्या हल्ल्यात गावकरी जखमी होत असून शेतकऱ्यांच्या जनावरांची शिकार होत आहे. त्यामुळे वाघाचा नागरी वस्त्यांमध्ये प्रवेश होणार नाही, यासाठी उपायोजना करण्याचे निर्देश वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
शासकीय विश्रामगृहात कोपामांडवी, अंधारवाडी, टेंभी व पाटणबोरी येथील गावकरी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वनमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक रामाराव, जि.प.सदस्य गजानन बेजंनकीवार, यवतमाळचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, पांढरकवडाचे उपवनसंरक्षक सुभाष दुमारे, विभागीय वनअधिकारी संदीप चव्हाण, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, कोपामांडवीचे सरपंच हनमंत कायपल्लीवार आदी उपस्थित होते.
यावेळी वनमंत्री राठोड म्हणाले, नरभक्षक वाघासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी 20 जणांच्या टीमने दिवसरात्र पेट्रोलिंग करावे. लोकांच्या संपर्कात राहून गावकऱ्यांना धीर द्यावा. तसेच या वाघाला पकडण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीम आणि विशेष व्याघ्र संरक्षण दल वाहनांसह तैनात करावी. गावकऱ्यांना आपापली जनावरे चराई संदर्भात जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मांडण्यात येईल. टिपेश्वर अभयारण्यालगत असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना 75 टक्के अनुदानावर सोलर फेंन्सिगचा लाभ द्यावा. अभयारण्यालगत तारेचे कुंपण घालावे. जेणेकरून वन्यप्राणी नागरी वस्त्यांमध्ये येणार नाही. तसेच वन्यप्राण्यांकडून होणारी नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.
वाघाच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झालेल्या गावकऱ्यांना वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते एकूण दोन लक्ष रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. यात सुकळी येथील रामबाई आत्राम यांना 30 हजार रुपयांचा धनादेश, टेंभी येथील सागर रामगिरवार (30 हजार रुपये), गजानन शेंडे (21 हजार रुपये), संतोष सैपटवार (18750 रुपये), सुन्ना येथील अरुण जिड्डेवार (19500 रुपये), विजय एंबडवार (18750 रुपये), टेंभी येथील यादव बडवाईकर (16500 रुपये), अंधारवाडी येथील लिंगा मेश्राम (15 हजार रुपये), इंद्रदेव कुमरे (7500 रुपये),कोब्बई येथील मोरेश्वर कुमरे (11250 रुपये), टेंभी येथील पंचफुला सोयाम (11250 रुपये) यांना धनादेश देण्यात आले.
बैठकीला वन विभागाचे अधिकारी व राहूल ताडविल्लेवार, सुभाष मेश्राम, गंगारेड्डी सुनकरवार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010 वाघ व मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करा

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update