unnamed
International Maharashtra National School & Collage Technology

विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे जेईई मुख्य आणि ‘नीट’ परीक्षार्थींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- दिनांक १ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये जेईई मुख्य आणि दि.१३ सप्टेंबर २०२० रोजी नीट परीक्षा होणार आहे. विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे  या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.  या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला. सामंत यांनी विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये,अशी विनंती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना केली आहे. ही विनंती त्यांनी तात्काळ मान्य करीत या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.

                Uday samant on exam 2 750x375 1 सामंत म्हणाले,या भागात  नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला ही परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा ही सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘जेईई-मेन्स’मध्ये सहभागी होणार आहेत. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून पूलदेखील पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या केंद्रावर  पोहोचणे अडचणीचे आहे. याबाबतची सविस्तर माहिती  केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना सामंत यांनी   दिली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असेही सामंत यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com