fbpx
dilkulas news and photo 1 e1602924932864 शिवभोजन योजनेचा राज्यातल्या २ कोटी नागरिकांनी घेतला लाभ
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- राज्यातले गोरगरीब, शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी सुरु केलेल्या शिवभोजन योजनेचा आतापर्यंत राज्यातल्या २ कोटी नागरिकांनी लाभ घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘शिवभोजन योजना – महत्त्वाकांक्षी कार्यक्रम’ या विषयावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या विशेष कार्यक्रमात शिवभोजन योजना, कोरोना काळात ही थाळी पाच रुपयात उपलब्ध करून दिली, या योजनेचा तालुकास्तरावर करण्यात आलेला विस्तार, टाळेबंदी व टाळेबंदी कालावधीनंतर योजनेची वाढवलेली व्याप्ती व लाभार्थ्यांनी घेतलेला लाभ, गरीब व गरजू यांचा या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद अशा विविध  विषयांवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM शिवभोजन योजनेचा राज्यातल्या २ कोटी नागरिकांनी घेतला लाभ

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update