Rajya utpadan shulk
Maharashtra Maharashtra Gov National

शुक्रवारी दिवसभरात ४ हजार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात ३ हजार ७५९ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री — राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- राज्यात 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. काल (शुक्रवारी)  दिवसभरात 4 हजार 009  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 3 हजार 759 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

                  मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 9,440 अनुज्ञप्ती सुरू  आहेत. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात 15 मे 2020 पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 1 एप्रिल 2020  ते 18 सप्टेंबर 2020 या काळात 1 लाख 56 हजार 085  ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी 1 लाख 50 हजार 955 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहेत. ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीद्वारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीनेसुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.

                  दि.24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. काल (शुक्रवारी) दि.18 सप्टेंबर 2020 रोजी राज्यात 123 गुन्हे नोंदविण्यात आले असून 86 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 32 लाख 69 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

                  दि.01 एप्रिल, 2020 पासून दि. 18 सप्टेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 18,304 गुन्हे नोंदविण्यात आले असून 9,937 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 1697 वाहने जप्त करण्यात आली असून 42 कोटी 23 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३  व्हाट्सअॅप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  commstateexcise@gmail.com  ई-मेल आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

Sidd

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com