fbpx
Speakar of assemblys visit scaled 1 शेतकऱ्यांच्या दु:खाचे निराकरण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशिल – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

विधानसभा अध्यक्षांची तीड्डी व दवडीपार (बेला) पूरबाधित गावांना भेट
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
भंडारा- तीड्डी या  पुरबाधीत गावाला पुराचा फटका बसून पाणी गावात येते. या ठिकाणी कन्हान, नागनदी व वैनगंगा नदीचा संगम होत असल्याने दूषित पाणी गावात येतो.  नागनदीच्या दुषित पाण्यामुळे गावात र्दुगंध पसरते तसेच अनेक जंतू व किडे या पाण्यातून गावात येतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. स्वनिर्णयाने गावातील लोक पुर्नवसित होण्यास तयार आहेत. त्याकरीता जमीन उपलब्ध करुन दयावी. तसेच गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका होणार नाही यासाठी उपाय योजना करण्याचे निर्देश  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. शेतकऱ्यांच्या दु:खाचे निराकरण करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्नशिल आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.गो

                सेखुर्द प्रकल्पबाधित तीड्डी व दवडीपार(बेला) गावांना भेट दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक जे.एम. शेख, सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल, उपविभागीय अधिकारी भस्मे, तहसिलदार अक्षय पोयाम, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई  व गोसेखुर्द प्रकल्प विभागाचे अधिकारी तसेच तीड्डी व दवडीपारचे सरपंच  उपस्थित होते. आरोग्यास धोकादायक वातावरण असल्याने  लोकांना गाव सोडून जावे लागले ही दुखा:ची बाब आहे. नदीच्या प्रदुषित पाण्याच्या वासामुळे उन्हाळयात नाहरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.  गोसेखुर्द  धरणामुळे शेतकरी आनंदी झाला. शेतकऱ्यांचा उद्धार होईल अशी भावना होती. शेतकरी सुखी झाला पाहिजे यासाठीच गोसेखुर्द प्रकल्पाची योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु गेल्या अनेक  वर्षापासून हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर तात्काळ उपाय योजना करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. सर्वेक्षणाअभावी  आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले.

                  जिल्हयातील लोकांच्या दु:खाचे निराकरण झाले पाहिजे. अजूनही लोकांना घर, जमीनपट्टे तसेच उर्वरित मोबदला मिळाला नाही. तीन पिढया यात निघून गेल्या पण प्रश्न सुटले नाही. सातत्याने याबाबत पाठपूरावा चालू आहे. पूरबाधीत जमीन विकायची नाही, त्याबदल्यात पर्यायी जमीन घ्यावी अशी राज्यात  पध्दत आहे. परंतु येथील लोकांनी  जमीन विकून घरे बांधली पर्यायी त्यांना उदरनिर्वाहाचे साधनच राहीले नाही. जमीनीच्या बदल्यात जमीन घेतली असती तर पुर्नवासितांचे प्रश्न निर्माण झाले नसते, असे ते म्हणाले.
स्वेच्छा पुर्नवसनामुळे रोजगाराचा प्रश्न सुटेल.  वैनगंगा नदीचे पाणी बारमाही शुध्द राहीले पाहिजे. यावर आपला भर असून त्यामुळे या शुध्द पाणी, वन्यप्राणी, जंगल याचा संगम साधून पर्यटनाला चालना देता येईल. केरळ मध्ये राबविण्यात येणाऱ्या पर्यटन पॅर्टन राबविण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याचा फायदा शेतीसह रोजगार निर्मितीसाठी होईल. सुदृढ जीवनासाठी स्वच्छ पाणी आवश्यक आहे. विकासाची वाटचाल कोराना संसर्गामुळे स्थगित झाली असली तरी  शेतकऱ्यांच्या दु:खाचे निराकरण करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्नशिर आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गावाची 75 टक्के घरे पूर बाधीत असल्यासच पूर्नवसन होते. दूषित पाणी व आरोग्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक जे. एम. शेख यांनी सांगितले. 75 टक्के पाण्याचे शुध्दीकरण लवकरच प्रक्रियेद्वारे होणार आहे. नाग नदीचे पाणी धरणाद्वारे अडवून शुध्दीकरण प्रकल्पाद्वारे पाण्याची र्निजंतूकीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दवडीपार(बेला) येथे वैनगंगा नदीचे  बॅक वॉटर नाल्याद्वारे गावात शिरते त्यामुळे येथील 98 घरे पुरबाधित झाली आहेत. त्यांना लवकरात लवकर पुर्नवसित करण्याचे विधान सभा अध्यक्षांनी सांगितले.यावेळी दवडीपार व तीड्डी येथील लोकांच्या समस्या व अडचणी विधानसभा अध्यक्षांनी जाणून घेवून त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update