timthumb
Maharashtra

सक्षम पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा  अपडेट राहा

मुंबई- भारतीय संस्कृतीत गुरु शिष्याची समृद्ध परंपरा आहे. विद्यार्थ्यांना गुणवंत, ज्ञानवंत, चारित्र्यसंपन्न बनवून देशासाठी सक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात त्या सर्व गुरुजनांचा महाराष्ट्राला अभिमान आहे, असे गौरवोद्गार काढत राज्यभरातील सर्व शिक्षक बंधु-भगिनींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक दिनानिमित्त माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीला वंदन केले आहे.

             माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करतो. आपल्या राज्याला गौरवशाली शैक्षणिक वारसा आहे. महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या असंख्य ध्येयनिष्ठ गुरुजनांनी राज्यात शिक्षणाची बीजे रोवली. शिक्षणाची गंगा सामान्यांच्या दारापर्यंत नेली. राज्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. विद्यार्थ्यांच्या कित्येक पिढ्या घडवल्या. याच पायावर आजचा संपन्न, समृद्ध आणि सुसंस्कृत महाराष्ट्र उभा आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ध्येयवादी शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व गुरुजनांचा महाराष्ट्राला अभिमान आहे. राज्यात सक्षम शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी राज्य शासन नेहमीच तत्पर असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

जाहिरात-

IMG 20200829 WA0010

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

 

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com