fbpx
Safai kamgaar meeting 1 1 750x375 1 सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन- धनंजय मुंडे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा  अपडेट राहा

मुंबई- सफाई कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते .यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे , समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे ,सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार , विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय ,वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सफाई कामगारांच्याबाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल. कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार तसेच नियुक्तीबाबतीत शैक्षणिक अर्हता तपासणार. सफाई कामगारांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात

IMG 20200829 WA0010 सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन- धनंजय मुंडे

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update