fbpx
WhatsApp Image 2020 09 14 at 15.15.00 750x375 1 समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने सोडविणार

अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे आश्वासन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

लातूर- समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित  देशमुख यांनी दिले आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर तमाशा (लोकनाट्य) क्षेत्राला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने आज सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी मंत्री अमित  देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

xWhatsApp Image 2020 09 14 at 15.15.01 1024x682.jpeg.pagespeed.ic.vN2 MPKfEk समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने सोडविणार

सध्याच्या कोरोना परिस्थितीत उत्सव, यात्रा पूर्णपणे बंद आहेत त्यामुळे तमाशा लोककलावंताना आपले जीवन जगणे अवघड जात आहे. त्यांना शासनाने एखाद्या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे, राज्य शासनाने पूर्वीचे तमाशा अनुदान चालू करावे अशा  विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने मंत्री अमित देशमुख यांना दिले. यावेळी श्री.देशमुख यांनी शिष्टमंडळाबरोबर सविस्तर चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या सर्व समस्या सोडवून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळातील सदस्यंना दिले. या शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे, मोहित नारायणगावकर, सुनिल वाडेकर, संभाजी जाधव, आनंद भिसे-पाटील आदींचा समावेश होता.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010 समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने सोडविणार

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update