Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर-अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणी कोरोना विषाणूबाबतच्या सूचनांचे पालन करून ऑक्टोबर महिन्याच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. शिबीरासाठी येणाऱ्या अर्जदारांनी मास्कचा वापर, विल्हेवाट लावण्याजोगे हातमोजे आणि सॅनिटायझर घेऊन यावे. शिबीरामध्ये एकमेकापासून सहा फुटाचे अंतर ठेवावे. पक्क्या परवान्याची चाचणी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनावर घेताना एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज करून दुसऱ्या उमेदवाराची चाचणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबीर टेंभुर्णी शासकीय विश्रामगृह येथे 6 ऑक्टोबर 2020 ला, सांगोला शासकीय विश्रामगृह-9 ऑक्टोबर, करमाळा शासकीय विश्रामगृह-13 ऑक्टोबर, माढा शासकीय विश्रामगृह-16 ऑक्टोबर, कुर्डूवाडी शासकीय विश्रामगृह-20 ऑक्टोबर, मोडनिंबमध्ये उपविभागीय अभियंता, सीना-माढा प्रकल्प उपविभाग-4 यांचे सांस्कृतिक भवन-23 ऑक्टोबरला होणार आहे.