fbpx
Min Balasaheb Patil web site Launch 1 750x375 1

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- सातारा जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी जिल्ह्यात केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

               सातारा जिल्ह्यातील कोविड-१९ मुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, ही केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली असून या covid19satara.in लिंक द्वारे रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होणार आहे.  एखाद्या तालुक्यात बेड उपलब्ध नसेल तर दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी  रुग्णालयात बेड उपलब्ध आहे का नाही याची माहिती मिळू शकते आणि बेडआभावी उपचार न मिळण्याच्या अडचणी दूर होण्यास मदत  होईल, असेही पाटील यांनी सांगितले.

यावेळी कोर ओशन सोल्युशन्स एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित तोडकर यांनी सादरीकरण केले. याबद्दल  काही अडचण आली तर  टोल फ्री  क्रमांक 1077 हा  सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update