20200915 205857
International National Technology

सिध्देश्वर वुमेन्स पाॅलिटेक्निकमध्ये कै. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंती व “अभियंता दिन” साजरा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- भारतातील प्रख्यात इंजिनिअर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० साली झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती ही अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने सिध्देश्वर वुमेन्स पाॅलिटेक्निकमध्ये कै. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांची जयंती व इंजिनिअर्स डे साजरा करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरूवात इंजि डाॅ. मोक्षगुंडम विश्वेश्वय्या व कै. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे अॅड आर एस पाटील, प्राचार्य गजानन धरणे व विभागप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
ज्यावेळेस संशोधनाची साधनं अत्यल्प होती त्यावेळी मोक्षगुंडम यांनी आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर अनेक नवनव्या गोष्टी तयार केल्या. त्याकाळी ते भारतातील अत्यंत हुशार आणि कल्पक असे इंजिनिअर म्हणून ओळखले जायचे. आपल्या अनेक कल्पक गोष्टी त्यांनी सत्यात उतरवून देशासाठी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी केलेल्या एकूण कार्याची भारत सरकारने देखील दखल घेत १९५५ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. तसेच यावेळी भक्तीचा वारसा, श्री सिध्दरामेश्वरांची भक्ती, सत्पुरूषांचा सहवास, देशभक्तीचा अभिमान, उत्तम चारित्र्य, समाजहितेषी, सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी, ध्येयनिष्ठ व कर्तृत्वसंपन्न जीवन जगणारे कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांची जयंती साजरी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड आर एस पाटील यांनी सर्व इंजिनिअर्सना हार्दीक शुभेच्छा दिले व तसेच कै. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी हे शिक्षणाने इंजिनिअर नसले तरी त्यांनी समाजहितेसाठी एका अभियंतासारखे भूमिका पार पाडली आहे. त्यांचेे स्वप्न साकार करण्यासाठी मुलींची शाळा, पाॅलिटेक्निक व इंजिनिअरींग काॅलेज उभे केले. काॅलेजचे प्राचार्य गजानन धरणे यांनी इंजिनिअर म्हणजे काय, इंजिनिअरचेे महत्व व विविध क्षेत्र्ाात इंजिनिअरचेे योगदान याची माहिती दिली. कर्मयोगी अप्पासाहेब काडादींचे स्वप्न श्री सिध्देश्वर वुमेन्स पाॅलिटेक्निकच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. स्त्रीयांनी स्वावलंबी, आत्मनिर्भर बनणे महत्वाचे असून तंत्रशिक्षण हा त्याचा पाया आहे हे सांगितले. यंदा कोरोना संसर्गामुळे अनेक कार्यालये आणि आणि महाविद्यालय अद्यापही बंदच आहेत. दरवर्षी अनेक कार्यालयात आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. पण यंदा त्याच जल्लोषात हा दिवस साजरा करता येणार नाही. म्हणून शासनाने सांगितलेल्या नियमानुसार सोशल डिस्टन्स ठेवून इंजिनिअर डे साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. निकीता अणवेकर यांनी यांनी केले.

#solapurcitynews

जाहिरात

Sidd

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com