fbpx
directorate of industrual safety and health 750x369 1 सुरक्षा लेखापरीक्षकांना मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून मान्यता मिळण्याकरिताविहित निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना २५ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे. संचालक, औद्योगिकसुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्यावतीने सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून मान्यता देणेसाठी शासनाने ठरविलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व्यक्तींनी प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह दोन संच २५ सप्टेंबर २०२० पर्यंत संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कामगारभवन, ई ब्लॉक, सी – २०, वांद्रे – कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१ इथे सादर करावा. तसेच अधिक माहितीसाठी www.mahadish.in या संकेतस्थळास भेट द्यावी असेही संचालकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010 सुरक्षा लेखापरीक्षकांना मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update