fbpx
images 1 1

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- गेल्या चार दिवसांपासून सोलापूरात पुन्हा दहा दिवसाचा लॉकडाऊन होणार असा चुकीचा मेसेज फिरत होता. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन केला जाणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असणारे मेसेजेस चुकीचे आहेत. लॉकडाऊन केला जाणार नसून नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काही भागात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार, अशा आशयाचे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाले. याबाबत शंभरकर यांनी सांगितले की, हे मेसेजेस पूर्णपणे चुकीचे असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गोंधळून जाऊ नये
लॉकडाऊन जाहीर करण्याचे चुकीचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉरवर्ड करू नयेत. अशा प्रकारचे चुकीचे आणि जनतेची दिशाभूल करणारे मेसेज सोशल मीडियावरून फॉरवर्ड करणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या रविवारी ‘नीट’ परीक्षा आहे. ती परीक्षा पूर्व नियोजित वेळेनुसारच पार पडेल, याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत दवाखान्यात जावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update