सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सर्वात उंच पुतळा उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार- सुरेश पाटील
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या धनगर समाजाच्या आराध्य दैवत आहेत. अहिल्यादेवी होळकर ह्या माळव्याच्या जहागिरदार असलेल्या होळकर घराण्याच्या ‘तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून ओळखल्या जातात. त्या उचित ज्ञानदानासाठी प्रसिद्ध होत्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, त्यांचा जिर्णोद्धार केला. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकामही केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नासिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अहिल्यादेवींनी त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. भारतीय संस्कृतीकोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 225 व्या पुण्यतिथी निम्मीत नगरसेवक पाटील यांच्या निवासस्थानी गजानन खटके व प्रशांत फत्तेपुरकर यांच्या हस्ते प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले. सोलापूरतील नागरिकांनी घरीच राहून पुण्यतिथी साजरी करा असे आव्हान या प्रसंगी केले. या प्रसंगी समाजाचे जेष्ठ नागरिक बसवराज जाटगल, शरणप्पा डोळ्ळे, नरसप्पा मंदकल, निंगप्पा पुजारी, बंडप्पा डोळ्ळे, सिद्राम बोराळे, विजय पुजारी, विश्वनाथ मंदकल, गंगाराम डोळ्ळे, अशोक कोळेकर, नागप्पा टिंगी आदी मान्यवर उपस्थित होते.
अशा या वीर मातेला नमन करून 13 ऑगस्ट रोजी पुण्यतिथी सोलापूरात धुमधडाक्यात साजरी केली जाते. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यापीठात अद्याप पुतळा उभे केले नाही. याबद्दल मी शासन दरबारी विचारणा करून राजमाता आहिल्या देवीचा सर्वात उंच पुतळा येत्या जयंती पर्यंत बसवण्याची मागणी करणार आहे. अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिले. भवानी पेठेत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पूजन करून घरातच उत्सव साजरा करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाभिमुख आणि जनकल्याणकारक राज्यकारभार करून राज्यकर्त्यांसाठी एक आदर्श निर्माण केला. गुणग्राहक व्यक्तिमत्व, कुशल राजनीतीज्ञ आणि प्रभावशाली शासक म्हणून त्यांचे स्मरण कायम राहील. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन करून जोरदार घोषणा देण्यात आले. दरवर्षी धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने पार पाडत असतात. परंतु यंदा जगभरात कोरोनाचे सावट असून घरीच सण उत्सव साजरा करण्याचे आव्हान या प्रसंगी देण्यात आले.
याप्रसंगी रमेश मंदकल, दिपक दुधाळे, विनायक पाटील, शिवा मंदकल, विजय कोळी, प्रशांत गाडेकर, अक्षय पाटील, शिवा हक्के सर्व समाज बांधव उपस्थित होते.
#solapurcitynews