सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेची कारवाई
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर : सोलापूरातील न्यू पाच्छा पेठ परिसरातील कुंचिकोरवे गल्ली परिसरात भाजप नगरसेवक आणि त्याच्या साथीदारामार्फत चालविल्या जाणाऱ्या मटका अड्यावर सोमवारी सायंकाळी सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने धाड टाकली आहे . त्यापूर्वी पोलिस आल्याची माहिती कळताच पळून जाण्याच्या प्रयत्नाने इमारतीवरुन पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या परिसरात भाजप नगरसेवक सुनील कामाठी, त्याचे भागीदार आणि कामागारमार्फत मटक्याचा अड्डा चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना मिळाली होती. परवेज ऊर्फ बब्बू नुरोद्दीन इनामदार ( 42 वर्षे रा. नई जिंदगी परिसर) याने देखील उडी मारुन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र उडी मारल्यानंतर डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच परवेज याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाताच पोलिस उपायुक्त बापू बांगार, सहाय्यक आयुक्त के. एस. ताकवले यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
#solapurcitynews