Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- रोजगार हमी योजनेसंदर्भात विविध विषयांवर दूरदृश्यव्दारे आयोजित वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी रोजगार हमी योजना प्रधान सचिव नंदकुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, रोजगार हमी योजनेचे आयुक्त श्री.नायक यांच्यासह राज्यातील विविध भागातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी रमेश भिसे, किशोर मोघे, अरुण शिवकर, सीमा कुलकर्णी, शुभदा देशमुख, संतोष राऊत, कुशावती बेळे, चंद्रकला भार्गव आदी उपस्थित होते. उपसभापती यांनी आयोजित केलेली ही रोहयो विभागासोबतची तिसरी बैठक आहे. पेण तालुक्यात १०७ शेततळी करण्यात आली असुन ३००० महिला मजुरांना संघटित करुन काम मिळवून देण्यात यश आल्याचे अरुण शिवकर यांनी सांगितले
ग्रामीण भागातील मजुरांना विविध फॉर्म कसे भरावे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणकोणती काम करता येतात. सार्वजनिक कामे कोणती,वैयक्तिक कामे कोणकोणती आहेत आदीसंदर्भात माहिती या जाणिवजागृतीमध्ये करण्यात येणार आहेत. महिला मजूरांना या विषयी माहिती करून देणे गरजेचे आहे, म्हणून त्यांना सविस्तर माहिती दिली जाईल, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रोजगार हमी योजना मंत्री यांना या सर्व संकल्पनेबाबत पाठपुरावा करणार असल्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. ज्या भागात मजुरांना जॉब कार्ड देण्यासाठी अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही, त्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल. ज्या ठिकाणी कामांची चौकशी सुरू आहे. तेथील पुढील कामे सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील.