Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
नागपूर- नागपूर शहरातील गेल्या महिनाभरापूर्वीच्या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने एकजुटीने समाधानकारक नियंत्रण आणले आहे. खाटांची, औषधांची व ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता आहे. तथापि, मृत्यू दर कमी करण्यासोबतच गृह अलगीकरणात (होम आयसोलेशन) असणाऱ्या रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा, अशी यंत्रणा बळकट करण्याचे निर्देश, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
डॉ. नितीन राऊत यांनी पालक सचिव असीम गुप्ता यांच्यासह मुंबई येथून आज कोरोना संदर्भातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागपूर येथून विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, यांच्यासह महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकार यांच्यासह विभाग प्रमुख सहभागी झाले होते.