Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशात अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय दलित मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या डोळ्यांसह शरीराच्या इतर भाग कापल्याची भयंकर घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, यात ऊसाच्या शेताचा मालक असलेल्याचाही समावेश आहे.
ADVT
शेतात मुलगी शौचासाठी गेल्यानंतर गावातील दोन तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. आरोपींनी पीडितेची हत्या करण्यापूर्वी प्रचंड हाल केल्याचंही समोर आलं आहे. आरोपींनी क्रूरपणे पीडितेचे डोळे फोडले. त्याचबरोबर तिची जीभही कापली. गळ्याला फास लावून तिला ओढण्यात आलं. पीडितेचा जीव गेल्यानंतर मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
#solapurcitynews