governor programme 2 750x375 1
Economy

26/11 दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे बलिदान सदैव प्रेरणादायी – राज्यपाल

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणपणाने लढताना मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे बलिदान सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी असेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

governor programme 1

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, मी सर्वप्रथम आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांना तसेच त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा नमन करतो. बलिदान ही देशाच्याप्रती एक भावना असते. प्रत्येकाची एक आई असते, त्याचप्रमाणे भारतमाता, अदृश्य माता या तीन माता प्रत्येक जवानांना शक्ती देत असतात. जे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी प्राणार्पण करतात ते अमर होतात. आणि हेच जवान आपल्या जीवाची पर्वा न करता आपले रक्षण करतात. त्याचप्रमाणे त्यांनी मुंबई आणि देशाचे रक्षण करून मोठे कार्य केले आहे. हे शहीद जवान वंदनीय व पूजनीय आहेत. या शहीद जवानांचे पाल्य आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करुन राज्यपालांनी शहीदांच्या कुटुंबियास पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

governor programme

२६/११ हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी मुंबईवर हल्ला होऊन आपले जवान शहीद झाले त्या दिवसापासून आपण हा दिवस शहीद दिन म्हणून पाळतो. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी प्राणपणाने लढताना मृत्युमुखी पडलेल्या शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहून शहीद अशोक मारुतीराव कामटे, विजय सहदेव साळसकर, प्रकाश पांडुरंग मोरे, बाबुराव साहेबराव धुरगुडे, बाळासाहेब चंद्रकात भोसले, तुकाराम गोपाळ ओंबळे, जयवंत हनुमंत पाटील, विजय मधुकर खाडेकर, अरुण रघुनाथ चित्ते, योगेश शिवाजी पाटील, अंबादास रामचंद्र पवार, शशांक चंद्रसेन शिंदे, मुरलीधर लक्ष्मण चौधरी, राहुल सुभाष शिंदे, नितेश भिकाजी जाधव यांच्या कुटुंबियांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लॅपटॉप व सन्मान चिन्ह देऊन कृतज्ञतापूर्व सन्मान करण्यात आला.

                     जीवन ज्योत संस्थेच्यावतीने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कृतज्ञतापूर्व सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार संगमलाल गुप्ता, आमदार मंगलप्रभात लोढा, जीवन ज्योत संस्थेचे अध्यक्ष मुरजी पटेल तसेच २६/११ मध्ये शहीद झालेल्या पोलिसांचे कुटुंबिय उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com