50 crore for proposed Buddhabhumi
Fund Maharashtra Solapur City

पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीसाठी केंद्राकडून पन्नास कोटी रुपयाचा निधी देणार : केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
बुद्धभूमीवर  मा.ना. रामदास आठवले यांच्या हस्ते श्रीलंकेतील बोधिवृक्षाचे रोपण   
पंढरपूर- पंढरपूर नगरपरिषदेने आपल्या सर्वसाधारण सभा अजेंडा विषय क्र. ५ ठराव क्र. ३७ दिनांक ३०/०४/२०१२ आणि अजेंडा विषय क्र. २३ प्रो. क. ११९ दिनांक १४/०९/२०१२  नुसार झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेने वेळोवेळी शासनस्तरावर पत्रव्यवहार करून दिनांक १३/०७/२०१८ रोजी जा. क्र./पं न पं /न अ /२९१९/२०१८ नुसार सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीवर सामाजिक न्याय विभागाचे केंद्रिय राज्यमंत्री, मा. ना. रामदासजी आठवले यांनी भेट दिली. सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा यांनी श्रीलंकेत रोपलेल्या महाबोधी वृक्षापासून अभिवृद्धीत  केलेल्या बोधिवृक्षाच्या बिजरोपणातून अंकुरित बोधिवृक्षाचे रोपण  मा.ना.रामदासजी आठवले यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
हे वाचा- आपला प्रभाग आपली जबाबदारी या अंतर्गत युवा नेते प्रवीण वालेंनी केले जनजागृती
 
                  याप्रसंगी त्यांनी, देशी-विदेशी पर्यटकांना, संशोधकांना, विचारवंतांना, साहित्यिकांना, कलावंतांना तथा उपासकांना आकर्षित करणारे तसेच भावी पिढीला प्रेरणा देणारे एकविसाव्या शतकातील पर्यावरणप्रिय, भारतीय वास्तुशिल्प कलेचा सर्वोत्कृष्ट नमुना ठरेल असे पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित  अत्याधुनिक भव्य बुद्धविहार साकारण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असून त्यासाठी केंद्र सरकार कडून पन्नास कोटी रुपयांचा निधी मिळवून देणार आणि पर्यटन विकासातून स्थानिकांना विविध व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी हेतू साध्य करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे आश्वासन देऊन पंढरपूर नगरपरिषदेचे अभिनंदन केले.  तसेच या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात यावेत अशी सूचना करून आपल्या विशेष काव्यशैलीत “येथे निर्माण होणार आहे बुद्धभूमी, त्यासाठी काहीच पडणार नाही कमी” अशी भावना व्यक्त केली. तसेच पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित बुद्धभुमिवर साकार होणाऱ्या भव्य, अत्याधुनिक तसेच पर्यावरणीय सौदर्य वृद्धिंगत करणाऱ्या बुद्धविहाराचे मानसचित्र पाहून समाधान व्यक्त केले. 
      
                   या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव सुनिल सर्वगोड, प्रदेश सरचिणीस राजा सरवदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. किर्तीपाल सर्वगोड तसेच सम्यक क्रांती मंचचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, सरचिटणीस रवि सर्वगोड, सहसचिव स्वप्नील गायकवाड, खजिनदार रविंद्र शेवडे,  प्रवीण माने, नगरसेवक महादेव भालेराव, माजी नगराध्यक्षा सौ. उज्वला भालेराव, माजी नगराध्यक्ष, लक्ष्मण शिरसट, माजी नगसेवक अंबादास धोत्रे, ओबीसी नेते अण्णा जाधव तसेच रिपाईचे जितेंद्र बनसोडे, संतोष पवार, मान्यवर उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com