Fund Solapur City

सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 827 कोटींचा निधी वितरित

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर-  गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त स्थितीमुळे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्याची नुकसान भरपाई म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापूर जिल्हासाठी 545 कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 282 कोटींचा निधी वितरित केल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. याबाबत चौथ्या अधिवेशनात आमदार सुभाष देशमुख यांनी या दोन्ही जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी, अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदार देशमुख यांनी वारंवार यासाठी वडेट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ना. विजय वडेट्टीवार यांनी आतापर्यंत राज्यात चार हजार 4489 कोटीचा निधी वितरित करण्यात आला असून यात सोलापूर जिल्ह्यासाठी 545 कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 282 कोटी चा निधी वितरित केल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांना पत्राद्वारे दिली आहे. दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी दिल्याबद्दल आमदार देशमुख यांनी वडेट्टीवार यांचे आभार मानले आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143