Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित
सोलापूर ACB: जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षण अधिकारी किरण लोहार यांचं लाचखोर प्रकरण उघडकीस येऊन 48 तास उलटत नाहीत तोच आज आणखी एक सरकारी कर्मचारी महिलेस लाच घेताना पकडण्यात आलं आहे. सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला लिपिक अश्विनी बडवणें यांना 4500 रुपयांची लाच घेताना सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी कार्यालयात रंगेहात पकडलं आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पहिलीच कारवाई झाली आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
पेन्शनच्या प्रकरणावरून जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला कनिष्ठ लिपिक बडवणे यांनी लाच मागितली होती. तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी सायंकाळी जिल्हा कोषागार कार्यालयात सापळा लावला होता. लाच स्वीकारताना महिला कर्मचारी बडवणे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143