Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- पुणे महामार्गावर पुण्याकडे निघालेल्या होंडा सिटी कार विरुद्ध दिशेला पलटी होत सोलापूरकडे निघालेल्या इनोव्हा कार व कंटेनरला धडकल्याने झालेल्या अपघातात सिद्धेश्वर बँकेचे संचालक एम. के. पाटील यांची कन्या अन् नात ठार झाले तर मुलगा आणि सून जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास माढा तालुक्यातील भोइंजे पाटीजवळ घडला.
पाटील कुटुंबीय एम एच 12 आर के 4754 क्रमांकाच्या होंडा सिटी कारमधून पुण्याकडे निघाले होते. या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावरून पलटी होत विरुद्ध दिशेला गेली. नंतर ती सोलापूरकडे निघालेल्या कंटेनरला धडकली.
या अपघातात माधुरी मल्लिनाथ चितकोटी (वय ३०, रा. सोलापूर) या जागीच ठार झाल्या तर सानवी मयूर पाटील (वय ७) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच मयूर मल्लिनाथ पाटील (वय ३३). संगीता मयूर पाटील (वय ३०) व मीरा मल्लिनाथ चितकोटी (वय ३) तसेच इनोव्हा कारमधील सलीम सय्यद (वय ३०) दिलीप गायकवाड (वय ७०, सर्वजण रा. सोलापूर) हे जखमी झाले आहेत. माधुरी चितकोटी या सिद्धेश्वर बँकेचे संचालक आणि कर सल्लागार एम.के. पाटील यांच्या कन्या असून सावनी पाटील ही त्यांची नात आहे
जखमींना पंढरपूर येथे तर किरकोळ जखमींना टेंभुर्णी येथे दाखल करण्यात आले आहे
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143