fbpx
Accident

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

काळजी करू नका-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ फोनद्वारे धीर

सोलापूर Accident-  सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोटजवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री महोदय यांनी यांनी दिले.

OBC साठी एकूण 30 प्रभाग आरक्षित – पालिका आयुक्त

                   Accident सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरूराज कुलकर्णी आणि वर्षा वडगावकर या सोलापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींशी व्हीडिओ कॉलद्वारे संवाद साधून विचारपूस केली. बरे आहात का…आम्ही सर्व यंत्रणेला सूचना केलेल्या आहेत…. प्रशासन तुमची चांगल्या पद्धतीने काळजी घेईल… कुणीही काळजी करू नका… असा धीर मुख्यमंत्र्यांनी अपघातातील जखमींना दिला. शासन आपल्याला सर्वतोपरी मदत करेल, असाही धीर दिला. दरम्यान, सकाळी अपघात झाल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी, एसटी महामंडळ व पोलिसांकडून माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या होत्या. बसमध्ये ४२ प्रवासी होते, त्यापैकी ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीपैकी २५ जणांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात, तिघांना अक्कलकोट ग्रामीण, दोघांना खाजगी दवाखान्यात दाखल केले असल्याची माहितीही श्री. शंभरकर यांनी दिली. कुणाची प्रकृती गंभीर नसून सर्वांवर चांगल्या पद्धतीने उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेवून सर्व जखमींची विचारपूस केली. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, डॉ. अग्रजा चिटणीस, डॉ. जयकर, महेश कोठे उपस्थित होते.

 जखमी प्रवाशांची नावे : सुजाता पोपट पेडगावकर (वय 45,रा.जामखेड अहमदनगर), गुरुराज लक्ष्मण कुलकर्णी(वय 45 सोलापूर), आनंदीबाई घटने (वय 56 ,रा रामपूर), वर्षा वडगावकर (वय 35 रा सोलापूर), शेखर संजय वडगावकर (वय 47,रा सोलापूर), ओंकार पेडगावकर (वय 16,रा जामखेड,अहमदनगर), जावेद बागवान (वय 33 रा मैंदर्गी ता अक्कलकोट),मल्लया हिरेमठ (वय 60 रा अक्कलकोट), मंगल इरय्या देशमुख(वय 76 ,रा सोलापूर), इरय्या शरणय्या देशमुख (वय 40,रा सोलापूर), शंकर राठोड (वय 35,सोलापूर), शोभा रमेश जाधव (वय 55,रा मुंबई), राहुल रमेश जाधव वय 30,रा मुंबई), रत्नाबाई मडप्पा मडचने (वय 60 वर्ष,रा.नावडग), समीक्षा संगमेश्वर पाटील(वय 14 रा सोलापूर), भाऊसाहेब यादवराव पाटील (वय 50 रा सोलापूर), मीना मुकुंद गायकवाड(वय 48 रा सोलापूर), देविदास परदेशी (वय 50,रा आळंद,जि गुलबर्गा),शशिकांत आंदोडगी (वय 70,रा अक्कलकोट), गणेश हिरजा(वय 19,रा सोलापूर), संगीता संगमेश्वर पाटील (वय 36,रा,जेऊर ता अक्कलकोट), शिवशरण बिराजदार (वय 58 वर्ष ,रा सोलापूर), सलीम हसनकडोंगी(वय 45 ,अक्कलकोट), सुयोग साळुंखे(वय 27 ,सांगली), शशिकांत कटारे (वय 55,रा हसापूर), मंजुषा सूर्यकांत (वय 40 वर्ष,रा नागन सूर ता अक्कलकोट), मंगल रश्मी(वय 60 ,रा सोलापूर), अमृता तानवडे (वय 33 रा पुणे) अशा तीस प्रवाशांची माहिती अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दिली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update