FB IMG 1642778014847
Maharashtra Solapur City

Accident : दुःखद बातमी- शेततळ्यात बुडून 3 बहिणींचा मृत्यू; उत्तर सोलापूरातील दुर्दैवी घटना

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Accident – शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, कैलास गुंड याच्या शेततळ्यात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात सारिका अक्षय ढेकळे (वय 22 ), गौरी अक्षय ढेकळे (वय ५) व आरोही अक्षय ढेकळे (वय २) असे मुलींचे नावे आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्याने खासगी क्लासेसवर मनपाची कारवाई
Accident गावचे उपसरपंच श्रीमंत बंडगर माहिती दिली की, मयत सारिका यांच्या नणंदेचे हे शेत आहे. अक्षय ढेकळे यांचेही शेत शेजारीच आहे त्यांची द्राक्षाची बाग आहे. दरम्यान दुपारी चारच्या सुमारास शेततळ्यात यांचा मृतदेह आढळून आला, यामध्ये सारिका ढेकळे यांनी त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुली गौरी आणि आरोही यांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दाखल झाले त्यांनी त्वरित हे तिन्ही मृतदेह बाहेर काढून त्याचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे मृतदेह पाठवून देण्यात आले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव हे घटनास्थळी दाखल होत आहेत या घटनेने पाथरी गावावर शोककळा पसरली असून एका महिन्याभरात अशी दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे यापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावामध्ये शेततळ्यामध्ये Accident तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला होता.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com