Maharashtra Solapur City

पंढरपूर- लोणद रेल्वे मार्ग, भुसंपादनाच्या खुणा दिसू लागल्या..

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पंढरपूर- ब्रिटिश काळापासून आजपर्यंत रखडलेल्या पंढरपूर- लोणंद या रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील खासदार असताना तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे त्यांनी नव्याने पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार झाले त्यावेळेस त्यांनी अधिकचा रेटा या प्रलंबित कामासाठी लावला. त्यात त्यांना यश आले. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अकलूजच्या सभेत यासंदर्भातील सूचक आश्वासन दिले होते. त्यानंतर सर्वेक्षणासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूदही झाली. त्यानंतर आता या रेल्वेमार्गासाठी प्रत्यक्षात भूसंपादनासाठीच्या खुना करणे सुरू झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव, वाखरी, गादेगाव येथे हे काम सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143