fbpx
election 750x375 1 पदवीधर संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; रविवारी प्रचारतोफा थंडावणार
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

जिल्ह्यात ५० मतदान केंद्रांवर २४० मतदान कर्मचारी नियुक्त

चंद्रपूर- नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी दि. 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. याकरिता चंद्रपूर जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील 32 हजार 761 मतदारांच्या मतदानाकरिता 50 केद्रांवर 240 मतदान कर्मचारी व आवश्यक सोयी सुविधांसह सज्ज झाले आहे. तरी मतदारांनी प्राधान्याने मतदान करून आपल्या अमुल्य मताचा वापर करावा व आपला हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

                       जिल्हा निवडणूक विभागाने पदवीधर मतदार संघाकरिता मतदान घेण्याची पुर्ण तयारी केली असून ग्रामीण व शहरी भागात प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचारी याप्रमाणे 50 मतदान केंद्रावर 200 कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच  राखीव पथकात 40 कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.  प्रत्येक मतदान केंद्रावर 1 याप्रमाणे 50 सुक्ष्म निरिक्षक तसेच 10 राखीव असे 60 सुक्ष्म निरिक्षक मतदान प्रक्रियेसाठी  काम करणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षिततेसाठी पोलीस दल नियुक्त आहे. सर्व मतदान केंद्रावर पाणी, शौचालय, वीज, अंपगासाठी रॅमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी 75 वाहन उपलब्ध असून प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस उपलब्ध असणार आहे. तसेच कोविड पार्श्वभूमिवर निवडणूक विभागाने सर्व मतदान केंद्रावर हात स्वच्छ करायला साबन, सॅनिटायझर,  पीपीई किट, हॅन्डग्लोव्हस, फेस मास्क, थर्मल गन इ. साहित्य उपलब्ध करून दिले असून प्रत्येक केंद्रावर दोन हेल्थ वर्कर तसेच तालुकास्तरावर वैद्यकीय चमु तैनात केली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी दिली आहे.

पदवीधर मतदार संघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाची वेळ सकाळी 8 ते  सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

जिल्ह्यातील मतदान केंद्र व पदवीधर मतदार

चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे असून व मतदारांची एकूण संख्या कंसात दर्शविली आहे. वरोरा तालुक्यातील मतदान केंद्र 6 (एकूण मतदार 2953), चिमुर 4(2080), नागभिड 3 (2391), ब्रम्हपुरी 5 (3161), सिंदेवाही 2 (1484), भद्रावती 4 (2671), चंद्रपूर 13 (8401), मुल 2 (1448), सावली 1 (959), बल्लारपूर 4 (2476),  राजुरा 2 (1812), कोरपना/जिवती 2 (1752), पोंभुर्णा 1 (427), गोंडपिपरी 1 (743) असे चंद्रपूर जिल्ह्यात एकुण 50 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. तर जिल्हयात 22 हजार 33 पुरुष व 10 हजार 733 महिला आणि 5 इतर  असे एकुण 32 हजार 761 पदवीधर मतदार आहे.

नागपूर पदवीधर मतदार संघात  नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.  विभागीय आयुक्त हे  या मतदार संघाचे  नोंदणी  अधिकारी  तर जिल्हाधिकारी हे सहाय्यक   मतदार नोंदणी अधिकारी आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातून सुनिता मनोहर पाटील- अपक्ष, डॉ. प्रकाश शंकर रामटेके-अपक्ष, शरद शामराव जिवतोडे-अपक्ष, नागपूर जिल्ह्यातून अभिजित गोंविदराव  वंजारी- भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस , संदीप दिवाकर जोशी- भारतीय जनता पार्टी,राजेंद्रकुमार  दादाजी चौधरी- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, राहुल महादेवराव वानखेडे-वंचित बहुजन आघाडी,  अतुलकुमार दादा खोब्रागडे- अपक्ष,  अमित केशवराव मेश्राम- अपक्ष, प्रशांत  भास्करराव डेकाटे- अपक्ष, नितीन दिलीपराव रोंघे-अपक्ष, मोहम्मद शकिर अहमद – अपक्ष, प्रा.डॉ. विनोद  तुळशीराम  राऊत-अपक्ष, बबन उर्फ अजय शरदराव तायवाडे –अपक्ष, वर्धा जिल्हयातून नितेश बाळकृष्णाजी कराळे- अपक्ष, राजेंद्र सुखदेवजी भुतडा- अपक्ष, प्रा. संगिता  श्रीकांत बढे- अपक्ष, भंडारा जिल्हयातून संजय रघुनाथ नासरे-अपक्ष, गोंदिया जिल्हयातून विरेंद्र कस्तुरचंद जयस्वाल-अपक्ष  असे 19 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे. उमेदवारांच्या प्रचारास 2 दिवस राहिले असून प्रचारतोफा 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता थांबणार आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM पदवीधर संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; रविवारी प्रचारतोफा थंडावणारडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update