fbpx
Solapur City News 15

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नाशिक जिल्ह्यात नवीन आठ गोदामे मंजूर झाल्याने जिल्ह्यातील साठवण क्षमता अधिक वाढणार

मुंबई-  नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव बसवंत ता. निफाड, नांदगाव ता. नांदगाव, अंगणगाव ता. येवला, मौजे राजूरबाहूला ता. नाशिक, मौजे चंदनपुरी ता. मालेगाव जि. नाशिक येथील शासकीय गोदाम बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यात अन्न, धान्याची अधिक साठवणूक करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी यांनी मौजे पिंपळगाव बसवंत ता. निफाड, नांदगाव ता. नांदगाव, अंगणगाव ता. येवला, मौजे राजूरबाहूला ता. नाशिक, मौजे चंदनपुरी ता. मालेगाव  येथील नवीन गोदाम बांधकामांच्या ०८ अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन देण्याबाबतच दि. १५ डिसेंबर २०२० रोजी पत्रान्वये विनंती केली होती. त्यानुसार नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव बसवंत ता. निफाड, नांदगाव ता. नांदगाव, अंगणगाव ता. येवला, मौजे राजूरबाहूला ता. नाशिक (०३ गोदाम ), मौजे चंदनपुरी ता. मालेगाव (०२ गोदाम ) येथील ०८ गोदामांच्या बांधकाम अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये अन्न, धान्याची साठवणूक करण्यासाठी अधिक आठ गोदामे मंजूर झाल्याने जिल्ह्यातील अन्न, धान्य साठविण्याची क्षमता अधिक वाढणार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाद्वारे खरेदी केलेले अन्नधान्य साठवणूक करण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर रेशन व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अन्न, धान्याचा साठा निर्माण होऊन अन्न, धान्याची टंचाईदेखील त्यामुळे निर्माण होणार नाही.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update