fbpx
Adult Education

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई Education – शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्त्याखालील अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतर शिक्षण संचालनालय (योजना) असे तर जिल्हास्तरावर ज्या ३० जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकारी निरंतर कार्यालय यापूर्वी अस्तित्त्वात होते, अशा ३० जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकारी निरंतर कार्यालयाचे नामांतर शिक्षणाधिकारी (योजना) असे करण्यात येणार असून प्राथमिक शिक्षण संचालनालय तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील योजना शिक्षण संचालनालय (योजना) यांच्याकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.

      Education या शासन निर्णयानुसार विभागातील विविध योजना ह्या जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या कार्यालयाकडून हाताळण्यात येतील. तसेच ३० जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) कार्यालयाचे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक शिक्षण) कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेले कामकाज शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडे वर्ग करण्यात येत आहे. Education तसेच कार्यालयाच्या जागेचा ताबा देखील शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडे वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. योजना वर्ग करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हे वाचा – शासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही

          Education वाशिम, हिंगोली, गोंदिया, नंदुरबार व पालघर येथील जिल्हा परिषद इमारतीमध्ये शिक्षणाधिकारी योजना कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करावी. या ५ जिल्ह्यामध्ये कार्यालयीन जागेची व्यवस्था होईपर्यंत योजनेचे कामकाज प्रचलित पद्धतीप्रमाणे सुरु राहील. Education या ५ जिल्ह्यामध्ये कार्यालयास जागा प्राप्त झाल्यानंतर व शिक्षणाधिकारी योजना कार्यालयासाठी वर्ग करण्यात आलेल्या गट अ व गट ब पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थी लाभाशी संबंधित योजना ह्या शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) व शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) यांनी तातडीने वर्ग करण्याची कार्यवाही करावी, असेही या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालय तसेच माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या योजना शिक्षण संचालनालय (योजना) यांच्याकडे वर्ग करण्यात येत असल्याने, दोन्ही संचालनालयातील काही पदे तसेच अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयातील पदे संचालनालय (योजना) यांच्या कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असल्याचेही या निर्णयात म्हटले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update