fbpx
124153610 1257491137948914 6339329722237474696 o
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर – सोलापूर परिवहन समितीचे माजी सभापती श्री विजयकुमार हत्तुरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री मा.सुशीलकुमारजी शिंदे यांनी ” जन वात्सल्य ” येथे सत्कार करून आशीर्वाद दिला. आपल्या परिवारातील सदस्य कुठेही असला तरी त्याला नेहमीच मदत करण्याची आपली भूमिका राहील,अशी सद्भावनाही त्यांनी व्यक्त केली. दहा वर्षांपूर्वी परिवहनचे सभापती म्हणून सत्कार केला होता.याचेही स्मरण यावेळी झाले. राजकारणात वेगळ्या पक्षात काम करीत असलो तरी व्यक्क्तिगत मी शिंदे कुटुंबियांचाच एक सदस्य आहे.म्हणूनच शिंदे साहेबांचा प्रेमळ आशीर्वाद माझ्यासोबत आहे.अशा शब्दात विजयकुमार हत्तुरे यांनी आभार व्यक्त केले.
               यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास गुत्तीकोंडा,दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेसचे नेते डाॅ.बसवराज बगले, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.मनोज कुलकर्णी, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस नितीन शिवशरण, युवक नेते रेवणसिध्द बिजरगी,दयानंद शिवयोगी,रासपचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सिध्दाराम जानकर ,आदि मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांना सुशील नेतृत्वाचे वात्सल्य लाभले…अशी कुजबुज काँग्रेसच्या गोटात चालू आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update