शेतकरी

महागाई व कृषी कायद्याविरोधात काँगेसचे ठाण्यात लाक्षणिक उपोषण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे- देशातील सर्व शेतकरीवर्ग,कामगारवर्ग,बेरोजगार युवक,महागाईने त्रस्त झालेला महिला वर्गाच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी राहणार असून त्यांच्यावर होत असलेल्या अन्याया विरोधात कायम विरोध करणार असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी ठाण्यात केले.
               महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संपूर्ण राज्यभर तीन काळे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी 26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली होती या बंदला पाठिंबा देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्य़ातील मुख्यालयासमोर उपोषण करण्यात आले जिल्हा काँग्रेसच्या वतीने ठाण्यातही स्टेशन बाहेर धरणे धरण्यात येउन दिवसभर काॅग्रेस कार्यकर्त्यांनी लक्षणिक उपोषण केले या उपोषणास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व ठाणे प्रभारी राजेश शर्मा,तारिक फारुकी,जिल्हाध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण,राकेश शेट्टी,कामगार कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी,आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नसीम खान यांनी सांगितले की,खोट्या खोट्या आश्वासनांच्या जिवावर सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आता या आश्वासनाचा विसर पडला आहे,देशातील शेतकरी आंदोलनात 300 नाहक बळी गेलेत,अजूनही हे आंदोलन सुरूच आहे,महागाई गगनाला भिडली असून बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असतानाही या सरकारला अजून जाग येत नसल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले.या सरकारला आता जागे करण्याची वेळ आली असून ठिकठिकाणी या सरकार विरोधात काॅग्रेस पक्षाबरोबर विविध कामगार संघटना,सामाजिक संस्था देखील सहभागी होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.याप्रसगी प्रदेश काँग्रेस,शहर काँग्रेस पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143