Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
पालिका कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्स व मास्कसाठी दंड लावणार का?
सोलापूर- कोरोना महामारीमुळे राज्याच्या तिजोरीत आर्थिक खडखडाट असून सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक विकासकामांसह कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना रखडली आहेत. असे असताना सोमवारी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या पाच व सहा या जुन्या प्रभागातील सफाई कामगार एक महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे कामावर न जाण्याचा निर्णय घेण्यात आले. एकंदरीत सोलापूर महानगरपालिकेत कोरोनामुळे कर आकारांची भर नसल्याने सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत पैसे कमी आहेत. असे असतानाही अचानक पालिका कर्मचारी बंद पुकारल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून आले आहे. त्याशिवाय मनपा अधिकारी सगळीकडे सोशल डिस्टन्स आणि मास्क चे शहरात दंड आकारताना मात्र आंदोलनावेळी एकालाही दंड आकारण्यात आले नाही. एकीकडे शहरवासीयांना सोशल डिस्टन्स असो किंवा मास्क. दंड करून पावती देत आहेत. कोरोना महामारीमध्ये पालिका सफाई कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा बजावताना मात्र अचानक काम बंद आंदोलन केले आहे. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर बंद मागे घेण्यात आले. परंतु वेळ निघून गेल्याने अनेक ठिकाणी साफसफाई कर्मचारी आले नसल्याचे दिसून आले. आज सकाळी अचानक काम बंद ठेवल्याने भवानी पेठ व इतर परिसरात घाणीचे साम्राज्य दिसून आले.
शहरात पालिका आयुक्तांच्या परिपत्रकाप्रमाणे नागरिकांवर विनामास्क कारवाई करताना दिसत आहे. मात्र लोकप्रतिनिधी व पालिका कर्मचाऱ्यांवर आंदोलनावेळी सोशल डिस्टन्स व मास्कची कारवाई करताना दिसत नाही. तसेच शहरात अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 वगळता इतर दुकाने उघडण्यास बंदी असताना अत्यावश्यक सेवा नसलेले दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत उघडी असतात. त्याठिकाणी कोणतेच अधिकारी जाऊन कारवाई करत नाहीत. याउलट गरिबांकडून दंड वसूल करणे, गरिबांची दुकाने बंद ठेवून मोठ्यांना कोणतेच कारवाई न करणे असे संबंधित अधिकाऱ्यांचे दुजाभाव सुरू आहे. याबाबत झोन अधिकारी लामकाने व उपायुक्त धनराज पांडे यांच्याशी संपर्क न झाल्याने कारवाई होणार का ? नाही यावर अद्याप स्पष्ट नाही.
#solapurcitynews