nana patole 750x375 1
Education/Collage/School Environment

साकोली येथील कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर- साकोली येथील  प्रस्तावित कृषी महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या चाळीस हेक्टर जागेचा संपूर्ण प्रस्ताव येत्या दोन दिवसांत सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र विधासभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. प्रस्तावित कृषी महाविद्यालय साकोली येथील आलेबेदर येथे सुरु करण्यात येत आहे. या महाविद्यालयासाठी  चाळीस हेक्टर जागेची आवश्यकता असून यासंबंधिचा प्रस्ताव महसूल विभागातर्फे वन विभागाला सादर करण्यात आला आहे. वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जागेची संयुक्त पाहणी करुन सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यावेळी नाना पटोले यांनी दिले.

                     साकोली येथे कृषी महाविद्यालय सुरु करण्यात येत असून यासाठी महसूल विभागातर्फे मौजा आलेबेदर (रिठी) या गावातील चाळीस हेक्टर जागेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या जागेसंदर्भात वन विभागातर्फे वनसदृष्य जंगल अथवा वन विभागाच्या नोंदीनुसार मालकीहक्कासंदर्भात तपासणी करुन या संदर्भातील प्रस्ताव येत्या तीन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्याच्या सूचना करताना विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी जागेच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या परवानगीसंदर्भातही वन विभाग व महसूल विभाग यांनी संयुक्तपणे जागेची पाहणी करुन शासन मान्यतेसाठी प्रस्ताव तयार करावा, असेही  या बैठकीत ठरले.

               विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कृषी महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, प्रादेशिक वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी निशिकांत सुके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मून, साकोलीचे उप विभागीय अधिकारी मनीषा दांडगे, भंडारा वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. डी. भलावी आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710
Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com