Maharashtra शेतकरी

‘महाराष्ट्रातील बदललेली शेती’ या विषयावर व्याख्यान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी दिल्ली- महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक हे २५ मार्च २०२१ रोजी  ‘महाराष्ट्रातील बदललेली शेती’ या विषयावर सातवे पुष्प गुंफणार आहेत. महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’आयोजित करण्यात आली आहे. २५ मार्च रोजी या व्याख्यानमालेच्या सातव्या दिवशी डॉ. बुधाजीराव मुळीक सायंकाळी ५ वाजता विचार मांडणार आहेत. ‘महाराष्ट्रातील बदललेली शेती’ या विषयाच्या माध्यमातून गेल्या ६० वर्षांतील शेतीतील बदलांवर ते प्रकाश टाकणार आहेत.

डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याविषयी…

कृषी क्षेत्रात डॉ. बुधाजीराव मुळीक यांचे मोलाचे योगदान असून ते शेतीच्या प्रगतीसाठी गेली पाच दशके कार्यरत आहेत. शेतीशी सबंधित केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक संस्था आणि  समित्यांवर  डॉ. मुळीक यांनी काम पाहिले आहे. आजही ते शेती क्षेत्रातील विविध संशोधन कार्यात गुंतले आहेत. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी २००३ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासह विविध मानाच्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.       

समाज माध्यमांतून उद्या व्याख्यानाचे प्रसारण  

गुरुवार 25 मार्च 2021 रोजी  सायंकाळी  5  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटर हँडल , फेसबुक  आणि युट्यूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मीडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युट्यूब चॅनेल वर पाहता येणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143