Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सांगली- जिल्हा नियोजन समितीमधून विकास कामांसाठी मंजूर निधी त्या त्या योजनांवर 31 मार्चपूर्वी खर्च करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात येणाऱ्या विकास कामांचा आढावा, विकास कामांवर झालेला खर्च, उर्वरित निधी, मंजूर कामे याबाबतचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम, वनविभाग, जलसंपदा, क्रीडा, लघुपाटबंधारे, विद्युत, रेशीम, तीर्थक्षेत्र, अंगणवाडी बांधकाम, उद्योजकता विकास, पाणंद रस्ते, पर्यटन, नगरोत्थान, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, नगरविकास, सामान्य सेवा आदी विविध विभागांकडील विषयांचा आढावा घेण्यात आला.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143
लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

