Andhra Pradesh have blocked a large dam
Environment Maharashtra

Dangerous Rain : आंध्रप्रदेशातील भयानक पावसामुळे मोठ्या धरणाला तडे गेल्याची भीती

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

आंध्रप्रदेश Dangerous Rain – आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थान सर्वांना माहिती आहेच. तिरुपती परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने Torrential Rain पूरस्थितीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तिरुपती शहरात असलेल्या सर्वात मोठ्या जलाशयाला तडे गेल्याची शंका व्यक्त करण्यात आल्याने, परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. तूर्त पावसाने उघडीप घेतली असली, तरी पूरस्थितीमुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत, तर अनेक रस्ते पावसात वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावे अजूनही पाण्याखाली आहेत. तिरुपतीच्या रामचंद्रपूरममध्ये रायला चेरवूच्या आसपास धरणाला Dam तडे गेल्याची माहिती आहे. यातून पाणी बाहेर आल्यास आसपास असलेली गावे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजेच्या वस्तू घेऊन परिसरातील नागरिकांना उंच स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या परिसरात फिरुन अधिकारी नागरिकांना धोक्याची सूचना Danger Notice देत आहेत.

अवकाळी पावसाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता

धरण फुटण्याची भीती असल्याने, नागरिकांनी गाव रिकामे करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते आहे. आपल्या परिसरातील नातेवाईकांनाही याची माहिती देण्यात यावी, असे सांगण्यात येते आहे. चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला डोंगरातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी बाहेर वाहून येते आहे, यामुळे स्वर्णमुखी नदीला मोठा पूर Flood आला आहे. या परिसरातील जलाशय आणि धरणांच्या मातीत मोठी दलदल निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. कडपा आणि अनंतपुरमू जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण बेपत्ता आहेत.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com