Maharashtra Solapur City

अन्नपूर्णा योजनांची माहिती स्वतः लोकांना सांगणार : डॉ. लहाने

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – लोकमंगलची अन्नपूर्णा योजनेचा राज्यात नावलौकीक झाला आहे. आपण स्वतः अन्नपूर्णा योजनांची माहिती लोकांना सांगणार असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. यावेळी डॉ. लहाने यांनी दरमहा 500 लाभार्थ्यांचा खर्चही आपण करणार असल्याचे सांगितले. डॉ. लहाने हे सोलापुरात खासगी कामासाठी आले होते. यावेळी त्यांनी लोकमंगलच्या अन्नपूर्णा योजनेला भेट दिली आणि त्याची माहिती घेतली. यावेळी शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर उपस्थित होते. लहाने म्हणाले की, केवळ 7 वर्षाच्या अल्प काळात ही अन्नपूर्णा योजनेचा संपूर्ण राज्यात नावलैकीक झाला आहे. लोकमंगलचे हे कार्य पाहून सोलापुरात आल्याचे समाधान झाल्यासारखे वाटले. आता आपण स्वतः या योजनेची माहिती प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांना सांगणार आहे. सर्वांनी या योजनेचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143