fbpx
images 1 5 लवकरच घोषित पुरस्कारांची रक्कम लवकरच मानकऱ्यांच्या खात्यात जमा करणार
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- कला क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करून कलावंतांचा यथोचित गौरव राज्य शासनातर्फे करण्यात येतो. मात्र यावर्षी कोविड-१९ या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आयोजनांवर आलेल्या बंधनांमुळे सांस्कृतिक कार्य विभागाला विविध पुरस्कार प्रदान सोहळे सध्या आयोजित करता येणे शक्य नसल्याने यावर्षीच्या घोषित पुरस्कारांच्या मानकऱ्यांची पुरस्काराची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

                सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार – ह.भ. प. बद्रिनाथ महाराज तनपुरेनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार – दिवंगत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरीसंगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री मधुवंती दांडेकरतमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार – ज्येष्ठ कलाकार गुलाबबाई संगमनेरकरगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार – ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना घोषित करण्यात आले असून लवकरच सर्व मानकऱ्यांची पुरस्काराची रक्कम थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरशासनाच्या नियमांचे पालन करून पुरस्कार प्रदान सोहळे आयोजित करता येतील आणि  मानचिन्हमानपत्रशाल व श्रीफळ मानकऱ्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येऊ शकतील”असेही सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 n लवकरच घोषित पुरस्कारांची रक्कम लवकरच मानकऱ्यांच्या खात्यात जमा करणारडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update