Narendra Modi anointed with diesel petrol in Akluj and protests against inflation as Aarti
Maharashtra

अकलूजमध्ये नरेंद्र मोदींना डिझेल पेट्रोलने अभिषेक घालून महागाईचा निषेध

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अकलूज- केंद्र सरकारच्या विरोधात व महागाई च्या निषेधार्थ अकलूजमधील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले. सदर निवेदन भारत देशाचे राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्यामार्फत करण्यात आले.सदर आंदोलनाचे निवेदन मंडलधिकारी चंद्रकांत भोसले यांनी स्वीकारले.यावेळी पंचायत समितीचे सदस्य अजय सकट, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद,लक्षवेधी सेना अध्यक्ष अनिल साठे,प्रदेशाध्यक्ष अमित भिंगारदिवे, मैत्री प्रतिष्ठान अध्यक्ष महेश शिंदे, जनसेवा संघटनेचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे, लक्षवेधी सेनेचे धवल कांबळे,सामाजिक न्याय चे तालुका कार्यध्यक्ष आकाश लोखंडे, समता परिषदचे पिंटू एकतपुरे, बहुजन ब्रिगेडचे धनाजी पाटील, भारती दलित महासंघाचे संतोष खंडागळे,सन्मित्र संघाचे सुरेश गंभीरे, मनसे चे शहराध्यक्ष सुदाम आवारे, बहुजन चे शहराध्यक्ष उदय कांबळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख, आदित्य काकडे, जावेद बागवान, राजू बागवान, रफिक मुलाणी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

             देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून महागाईने उच्चांक गाठला असल्याचे दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत,सर्वसामान्य जनतेचे या महागाईने कंबरडे मोडले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्याच्या अगोदर अच्छे दिन आणण्याचे स्वप्न देशातील जनतेला दाखवले जाते,मात्र ते स्वप्न प्रत्येक्षात उतरविण्यात भारतीय जनता पक्ष कमी पडला असून जनतेची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा आरोप साठेनी केला आहे.

गॅस,डिझेल,पेट्रोल,खाद्य तेल तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीनी सर्वसामान्य जनतेचे रोजचे नियोजन कोलमडले आहे,ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळेस महागाई मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने अनेकांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडूच होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे साठे यांनी सांगितले. गॅस,डिझेल,पेट्रोल, खाद्य तेल यांच्या किमती तात्काळ भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा आणि सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून दिशाभूल केल्याने त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गॅस टाकीवर त्यांची प्रतिमा ठेवून डिझेल,पेट्रोल,ने अभिषेक करून प्रधानमंत्री यांना जय देव जय देवजय फेकू देवाच्या नावाने आरती म्हणून आंदोलन समाप्त करण्यात आले. अकलूजमधील आक्रोश आंदोलनामध्ये घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला असल्याचे पाहायला मिळाले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143