Solapur City News 16
Covid 19 निधन वार्ता

आणखी एका क्रिकेटपटूचा कोरोना मुळे मृत्यू

मुंबई- ओडिशा क्रिकेट टीमचे माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा यांचा बुधवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. एम्स भुवनेश्वरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 47 वर्षांच्या प्रशांत मोहपात्रा यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली, असं एम्स भुवनेश्वरचे अधिक्षक डॉ.एस.एन मोहंती यांनी सांगितलं. प्रशांत यांचे वडील आणि राज्यसभा खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचं 10 मे रोजी कोरोनामुळे निधन झालं होतं. तसंच प्रशांत यांचा भाऊ जसबंत यांच्यावरही याच रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू आहेत. 1 सप्टेंबर 1973 साली जन्मलेले प्रशांत मोहपात्रा बॅट्समन होतं. 1990 साली त्यांनी बिहारविरुद्ध रणजी ट्रॉफीत पदार्पण केलं. तर दुलीप आणि देवधर ट्रॉफीमध्ये ते इस्ट झोनकडून खेळायचे. प्रशांत यांनी 45 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 30.08 च्या सरासरीने 2,196 रन केले, यामध्ये 5 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. निवृत्ती घेतल्यानंतर प्रशांत यांची बीसीसीआयने मॅच रेफ्री म्हणून नियुक्ती केली होती.

                     प्रशांत यांचे वडील आणि राज्यसभा खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचं 9 मे रोजी कोरोनामुळेच निधन झालं. रघुनाथ यांचा जन्म पुरीमध्ये झाला होता. 1976 साली त्यांना पद्मश्री, 2001 साली पद्म भूषण आणि 2013 साली पद्म विभूषण म्हणून गौरवण्यात आलं.

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com