Covid 19 Solapur City

शहरातील मॉल्समध्ये प्रवेशासाठी आता होणार अँटीजन कोरोना चाचणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे – शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ठाणे महापालिकेने मॉलमध्ये प्रवेश करताना अँटीजन कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने या नियमांचे पालन ठाण्यातील मॉल देखील करत असून विवीयाना मॉल मध्ये कोरोना चाचणी केल्याशिवाय कोणालाही मॉलमध्ये प्रवेश देण्यात येत नाही. सद्यस्थितीत नागरिकांना गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. शहरातील मॉल्स, तसेच मार्केट मध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून मॉल्समध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांची अँटीजन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचे पालन ठाण्यातील विवीयाना मॉल करत आहे.नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मॉल मध्ये येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करूनच निगेटिव्ह रिपार्ट आल्यावरच मॉल मध्ये प्रवेश देण्यात येत आहे.या आधी देेखिल विवीयाना मोलाच्या वतीने सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच नागरिकांना मॉल मध्ये प्रवेश देण्यात येत होता.आता कोरोना चाचणी महापालिकेने बंधनकारक केल्याने त्यांची देखील अंमलबजावणी मॉल प्रश्न करत आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143