images 1 2
Election

निर्भिडपणे मतदान करा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबर 2020 रोजी होत आहे. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास किंवा दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी  तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

            मतदान सकाळी 8 ते सायकांळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये अपात्र असणाऱ्या व तोतयागिरी करणाऱ्या बनावट व्यक्तींवर प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे. एखादी व्यक्ती बनावट मतदान करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळल्यास भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.

मतदानासाठी खालील कागदपत्रे पात्र आहेत.

  • मतदान ओळखपत्र
  • आधार कार्ड.
  • वाहनचालक परवाना.
  • पॅन कार्ड
  • पारपत्र
  • केंद्र/राज्य शासन/सावर्जनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी औद्योगीक संस्था यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र.
  • खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र.
  • संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असणाऱ्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र.
  • विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी/पदवीका मूळ प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत कलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर

    महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. निवडणुकीचे मतदान येत्या मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायकांळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून  निर्देश प्राप्त झाले आहेत. मतदानासाठी देण्यात आलेली रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे. ही रजा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबईकडील शासन निर्णय क्रमांक – विनेर,2011/प्र.क्र.146/का-29 दिनांक 23 जून 2011 अन्वये अनुज्ञेय असणार आहे. 

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com