20210312 133450
Maharashtra Solapur City

स्वच्छ भारत अभियानाचा देखावा नको कृती करा; निधीसाठी स्वच्छतेचा दिखाऊपणा- सुरेश पाटील

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे.
                       घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल… गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल… शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. त्यांचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्राचा हातभारही मोठ्या प्रमाणात लागत असताना मात्र सोलापूर शहरात मात्र नाल्यावर थेट कापडी जाळी मारलेली दिसत आहे. अशी स्वच्छता दाखवून सोलापूर महानगर पालिका केंद्रासारकारच्या पथकाद्वारे पैसे मंजूर करून घेत असल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीसाठी सोलापूर मनपातील सर्व संबंधित अधिकारी गेल्या काही दिवसांपासून काम करताना दिसत आहेत. परंतु सर्वेक्षणासाठी येणाऱ्या टीम येणार असे कळताच स्वच्छता साठी अनेक ठिकाणी काळजी घेतानाचे चित्र सध्या शहरातील काही भागात दिसत आहे. पण दररोज जर या ठिकाणची पाहणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली असती तर ही वेळ आली नसती. लाखो रुपये खर्च करून नाल्यावर पडदा लावण्यापेक्षा त्याच पैशात एखादी संरक्षण भिंत बांधली असते तर भविष्यात अश्या दुर्गंधी पासून नागरिकांना सुटका मिळाला असता आणि भविष्यात महानगरपालिकेची जाहिरात किंवा कर थकबाकीदारांची यादी देखिल जाहीर करण्यासाठी मदत झाली असती. परंतु एकही अधिकाऱ्यांनी याची दखल न घेता लाखो रुपयांचा चुराडा करण्यात मग्न दिसत आहेत. ज्या ठिकाणी व ज्या भागात सर्वेक्षण टिम जाणार आहे त्या ठिकाणचे सामुहिक शौचालय सार्वजनिक शौचालय, मुतारी, कचरा कुंडी, नाले, घनकचरा नियोजन, आदी भागात स्वच्छता केल्याचे आढळून आले आहे व इतर भागात मात्र त्या स्वच्छ भारत अभियानाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. अशी बोगस स्वच्छता सर्वेक्षण जर सोलापूरात झाली तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी गप्प बसणार नाही. संपूर्ण शहरातील संपूर्ण कानाकोपऱ्यात हे अभियान पोहचे नाही तर सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे गाड्या अडवून जनआंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143