Electricity Maharashtra Solapur City

शेळगी-दहिटणे येथे नवीन विद्युत उपकेंद्राला मान्यता द्या; आमदार विजयकुमार देशमुख यांची ऊर्जा मंत्र्यांकडे मागणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- शेळगी-दहिटणे  येथे नवीन विद्युत उपकेंद्राला मान्यता द्या,अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार देशमुख यांनी ऊर्जामंत्री यांना पाठवलेल्या निवेदन दिले आहे. शेळगी, दहिटणे हा भाग हद्दवाढमध्ये समाविष्ट असून हद्दवाढ सन 1992 मध्ये झाली. या हद्दवाढ भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवसाहत वाढत असून या भागात सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होणे, विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे या भागात चो-या होणे असे अनेक प्रकार सातत्याने घडत आहेत. बाळे उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या शेळगी- दहिटणे परिसरात २० कि.मी. पर्यत लाईन आहे . ही लाईन खुप जुनी झालेली आहे. या परिसरात जवळपास 9 हजार विद्युत ग्राहक असून विद्युत वितरण कंपनीच्या नियमानुसार 5 हजार ग्राहका मागे एक उपकेंद्र असणे आवश्यक आहे, परंतु शेळगी-दहिटणे भागात 9 हजार हजार ग्राहक असूनही उपकेंद्रा ची निर्मिती अद्याप झालेली नाही. 
         शेळगी भाग शहरात येऊन देखील ग्रामीण भागाप्रमाणेच या परिसरात विद्युत पुरवठा होतो. विद्युत खंडीत होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे . मी मंत्रीपदावर असताना या भागाकरिता शहरी भागातून विद्युत पुरवठा होणेसाठी उळेगांवपासून स्वतंत्र लाईन टाकण्यासाठी 27 लाख इतका निधी उपलब्ध करून दिला होता . एवढा निधी खर्च करूनही हा प्रश्न सुटलेला नाही शेळगी व दहिटणे भागासाठी पुरेसे कर्मचारी संख्याबळ उपलब्ध नसल्याने या भागात विद्युत सेवा पुरविणे जिकरीचे होत आहे. हे लक्षात घेऊन  येथे नवीन विद्युत उपकेंद्र सुरू करण्याकामी व आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देणेकामी सबंधितांना तात्काळ निर्देश द्यावे, असे  निवेदनात नमूद आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com