Solapur City News 4
Crime Maharashtra

मनसुख हिरेन केसचा तपास; स्फोटके पुरवणाऱ्या दोन लोकांना NIA ने केली अटक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी अर्थात अँटिलियाच्या बाहेरुन जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या संदर्भात एनआयएने आज आणखी दोन लोकांना अटक केली आहे. मुंबईच्या मालाडमधील कुरार गावात पकडल्या गेलेल्या या लोकांवर या प्रकरणात अटक झालेल्या माजी एपीआय सचिन वाझेला जिलेटिनच्या कांड्या दिल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यातील एकाला लातूर येथून अटक करण्यात आली. अटक केलेले दोन्ही आरोपी संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना मंगळवारी स्थानिक एनआयए कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना 21 जूनपर्यंत एनआयएच्या ताब्यात पाठवले आहे. स्कॉर्पिओत स्फोटक आढळल्या प्रकरणातील एनआयएची ही सातवी अटक आहे. यापूर्वी सचिन वाझे, रियाज काझी, माजी निरीक्षक सुनील माने, माजी हवालदार विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोरे यांना अटक करण्यात आली होती. एनआयएच्या सूत्रांनुसार, मनसुख हिरेनच्या हत्येत संतोष शेलार आणि आंदर जाधव यांचा हात असल्याचा संशय आहे. दरम्यान, अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.

हे वाचा- रुग्णसेवेबरोबरच समाजसेवा कौतुकास्पद : श्रीकंठ शिवाचार्य

25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेले स्कॉर्पिओ वाहन दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील अँटिल्यापासून 300 मीटर अंतरावर उभी असल्याचे आढळले. कारमध्ये 20 जिलेटिन कांड्या व धमकीचे एक पत्र सापडले. 5 मार्च रोजी त्याचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह रेती बंदरच्या उपसागरातून सापडला. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने त्यात हत्येचा गुन्हा दाखल करून 2 जणांना अटक केली. यानंतर या प्रकरणात NIA ची एंट्री झाली आणि 13 मार्चला सचिन वाझेला अटक करण्यात आली होती.

3 लेवलवर सुरू होता अँटिलिया केसचा तपास
अँटिलिया बाहेरुन स्फोटक सापडण्याच्या प्रकरणात तीन वेगवेगळ्या केस दाखल झाल्या आहेत. तिन्ही प्रकरणांची सध्याची स्थिती अशी आहे –

  • पहिली केस मनसुख हिरेनची स्कॉर्पिओ चोरी होण्याची आहे, ज्यामध्ये मुंबईचे गामदेवी पोलिस तपास करत आहेत.
  • दुसरी केस अंबानीच्या घराजवळ आढळलेली जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओचे आहे. याचा तपास NIA च्या हातात आहे. या केसमध्ये सचिन वाझेला अटक करण्यात आली आहे.
  • तिसरी केस स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येची आहे. या प्रकरणामध्ये महाराष्ट्र एटीएस तपास करत होते. आता ठाणे कोर्टाच्या आदेशानंतर या केसलाही एनआयएला ट्रान्सफर करण्यात आले आहे. खरेतर एटीएसने आतापर्यंत ही केस बंद करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com